Halaman

    Social Items

दही शेवया रेसीपी मराठीत | गोड शेवया | Dahi / Yogurt Shevaya Recipe in Marathi | Sweet Shevaya

दही शेवया रेसीपी मराठीत | गोड शेवया | Dahi / Yogurt Shevaya Recipe in Marathi | Sweet Shevaya




साहित्य-


  • पाऊण वाटी शेवया,
  • तूप,
  • फेटलेले दही दोन वाट्या,
  • चवीनुसार मीठ,
  • पाव चमचा मिरेपूड किंवा मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे,
  • खोबऱ्याचे पातळ काप (हलके तळून घेतलेले),
  • कोथिंबीर,
  • तडक्याकरिता जिरे,
  • हिंग,
  • मोहरी आणि
  • चवीला साखर.




कृती -


  • शेवया प्रथम तुपावर परतवून घ्या.
  • उकळत्या पाण्यात किंचित मीठ घालून त्यात शेवया घाला
  • शेवया उकळल्यावर चाळणीत ओता
  • आणि त्यावर गार पाणी ओता.
  • त्यामुळे शेवया मोकळ्या होतील.
  • त्याला थोडे हाताने तूप चोळा.
  • फेटलेल्या दह्यात मीठ, मिरेपूड, साखर व खोबऱ्याचे काप घाला.
  • आता शेवया घाला.
  • तुप गरम करून हिंग, जिरे, मोहरीचा तडका लावा आणि
  • सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
  • वरून कोथिंबीर घालून सुशोभित करा.
  • या शेवया जेवणात किंवा नाश्त्याकरिताही सर्व्ह करू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.