Halaman

    Social Items

मटार पराठा रेसीपी मराठीत | Green Peas Paratha Recipe in Marathi | How to make Matar Paratha | Stuffed Paratha

मटार पराठा रेसीपी मराठीत | Green Peas Paratha Recipe in Marathi | How to make Matar Paratha | Stuffed Paratha



साहित्य-


  • अर्धा किलो मटारचे दाणे,
  • एक चमचा आलं लसूण पेस्ट,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मिरची,
  • एक चमचा ओवा,
  • तेल,
  • चवीपुरते मीठ,
  • कणिक,
  • मैदा.




कृती-


  • मटार सोलून दाणे धुवून चांगले बराच वेळ निथळत ठेवावेत.
  • मिक्सर मधून बारीक करावेत.
  • नॉन स्टिक पॅनमध्ये तेलावर आले.
  • लसूण यांची पेस्ट हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घालून त्यावर मटाराचा लगदा घालावा.
  • मीठ व ओवा घालून परतावे.
  • अगदी सुके होऊ द्यावे.
  • वरून कोथिंबीर घालावी
  • कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी.
  • त्यात अर्धी वाटी मैदाही चाळुन घालावा.
  • मोयन घालून कणिक भिजवावी.
  • गोल पोळी लाटून त्यात एक मोठा चमचा मटाराचे सारण भरून हाताने सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून सुकी कणिक लावून हलक्या हाताने पराठा गोलाकार लाटावा.
  • दोन्ही बाजूने तूप सोडून खमंग भाजावा व दह्याबरोबर खावा. 




कणिक भिजवणे-


पराठ्याची कणिक जरी साधी पोळ्यांच्या कणिकेसारखीच भिजवायची असली तरीही ती भिजवल्यानंतर थोडे थोडे तेल व पाणी लावून तळहाताने किंवा बोटांच्या मागच्या बाजने दहा ते पंधरा मिनिटे तिंबावी व नंतर अर्धा तास झाकून ठेवावी. कणिक जितकी मऊ तेवढा पराठा खुसखुशीत होतो.




टीप:-


  • सारण पूर्ण थंड झाले पाहिजे.
  • मुळे, फुलकोबी इत्यादी भाज्यांचे पराठे करावयाचे असतील तर जास्तीचे मीठ, कोथिंबीर, आले लसूण व हिरवी मिरची यांची पेस्ट, ओवा व मोयन कणिकेतच घालून कणिक भिजवावी.
  • कारण जर या भाज्यांच्या किसात मीठ घातले तर थोड्या वेळाने त्या भाज्या पाणी सोडतात
  • व पराठे फुटतात.
  • मुळ्याचे पराठे करताना मुळे धुऊन वरची साले काढून, किसून घट्ट पिळून घ्यावेत
  • व वर सांगितल्याप्रमाणे कणिक भिजवावी.
  • मुळ्याचा किस घालून भरून पराठे करावेत.
  • कोबीचे फूल स्वच्छ धुवून बराच वेळ चाळणीवर निथळत ठेवावे.
  • बुडखाकडून व फुलाकडून पूर्ण पाणी निथळून गेल्यावर कोबी किसावा
  • व पराठे बनवावेत.
  • बटाट्याचे पराठे बनवताना बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.
  • कांदा बारीक चिरून घ्यावा.
  • आले लसूण व मिरची यांची पेस्ट करून घ्यावी.
  • कढईत प्रथम थोडे तेल घालून त्यावर ती पेस्ट व कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा.
  • त्यातच मीठ घालावे.
  • ओवा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • बटाट्याच्या बारीक फोडी करून घालाव्यात.
  • थोडा वेळ परतून घेतल्यावर गॅस बंद करावा.
  • थंड झाल्यावर हाताने एकदम बारीक कुस्करून त्याचा एकजीव असा गोळा तयार करावा व कणकेत भरून पराठा लाटावा.
  • कोणताही भरवा पराठा बनवताना कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी
  • व त्यात थोडासा मैदाही चाळून घालावा म्हणजे पराठा उकलत नाही.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.