तुर व मुग डाळीचे पराठे रेसीपी मराठीत | उरलेल्या डाळीचे पराठे | Dal Paratha Recipe in Marathi | Toor Dal & Moon Dal Paratha | Stuffed Dal Paratha | Leftover Dal Paratha
साहित्य-
- १ पाव तुरीची डाळ,
- मुगाची डाळ अर्धी वाटी,
- कणीक
- तेल,
- हिंग
- मोहरी,
- तिखट
- मीठ,
- कांदा,
- आलं,
- लसूण
- मिरची.
कृती-
- तुरीची व मुगाची डाळ कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्यावी.
- कांदा किसून घ्यावा.
- आलं लसूण मिरची वाटून घ्यावी.
- शिजवलेली तुरीची डाळ चांगली बारीक करुन घ्यावी.
- नंतर कढईत तेल हिंग मोहरीची, फोडणी करून किसलेला कांदा गुलाबी परतून घ्यावा
- नंतर त्यात घोटलेली डाळ टाकून आलं लसूण मिरचीचा वाटलेला गोळा, तिखट मीठ हळद टाकून सर्व चांगले परतून घ्या.
- परातीत ओतून थंड होऊ द्या.
- एकीकडे मोहन घालून व थोडे मीठ टाकन कणीक भिजवून घ्या.
- ५ मिनिटे मुरल्यावर कणकीचा छोटा गोळा वाटीप्रमाणे करा
- व त्यात थंड झालेले डाळीचे सारण भरून पुरण पोळीप्रमाणे पराठे करावे
- फ्रायपॅनमध्ये किंवा तव्यावर तेल टाकून खमंग भाजून घ्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.