कारल्याचे पंचामृत रेसीपी मराठीत | Bitter Gourd Sabji|Karela sabji without garlic & onion | Panchamrut Recipe in Marathi
साहित्य -
- ५-६ मध्यम आकाराची कारली.
- दाणे १ टेबलस्पून,
- सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे १/४ वाटी.
- १ टी स्पून तीळ,
- चिंच,
- १/२ वाटी गूळ,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- तेल,
- मोहरी,
- हिंग.
कृती -
- कारली चिरून त्याच्या बिया काढून टाकाव्यात व
- चिरलेल्या कारल्याच्या फोडींना थोडे मीठ लावून दाबून ठेवावे.
- चिंचेचा कोळ १/४ वाटी घ्यावा.
- १५ मिनिटे कारली दाबून ठेवली की नंतर पिळून घ्यावी.
- कढईत १ टेबलस्पून तेल टाकून हिंगाची फोडणी झाली की तीळ, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे टाकावे
- व थोडा वेळ मध्यम आचेवर होऊ द्यावे.
- नंतर कारल्याच्या फोडी टाकाव्यात
- व तिखट मीठ घालून नीट मिसळून शिजू द्यावे.
- मधून-मधून थोडे पाणी टाकावे.
- कारली नीट शिजली की त्यात चिंचेचा कोळ व गूळ घालून चांगले उकळू द्यावे.
- हे पंचामृत चवीला छान लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.