Halaman

    Social Items

आंबा कैरीचे पौष्टिक चॉकलेट रेसीपी मराठीत | Aamba kairiche Nutritious Chocolate Recipe in Marathi | Mango Nutritious chocolate

आंबा कैरीचे पौष्टिक चॉकलेट रेसीपी मराठीत | Aamba kairiche Nutritious Chocolate Recipe in Marathi | Mango Nutritious chocolate




साहित्य-


  • १ छोटा पिकलेला रसाळ आंबा,
  • १ कच्ची कैरी,
  • १ वाटा खारकेचे बारीक तुकडे,
  • खोबऱ्याचे बारीक काप १ वाटी,
  • काजू,
  • बदाम,
  • बेदाणा प्रत्येकी १/२ वाटी,
  • १ वाटी साखर,
  • १ वाटी साजूक तूप,
  • वेलची पूड,
  • बोर्नव्हिटा पावडर आवडीनुसार.




कृती-


  • आंब्याचा रस आटवा.
  • कैरीची साल काढून किसून त्यात साखर मिसळा व १/२ तास मुरू द्या.
  • खारीक, खोबरं तुपात खमंग भाजा व
  • त्यात काजू, बदाम, वेलची टाकुन मिक्सरमधून काढा.
  • साधारण रवाळच ठेवा.
  • कैरी व साखरेचे मिश्रण पाक होईपर्यंत शिजवा व
  • त्यात आंब्याचा आटवलेला रस व डायफ्रुट बारीक केलले मिसळा.
  • वरून तुप गरम करून ओता व
  • मिश्रण चांगले एकजीव करा.
  • बेदाणा टाका.
  • नंतर ताटाला तूप लावून मिश्रण ताटात ओतून सारखे पसरवा.
  • थोडं थंड झाल्यावर चॉकलेटच्या आकारात कापा.
  • आवडत असल्यास यात बोर्नव्हिटा किंवा तत्सम पावडर मिसळ शकता.
  • अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यावर चॉकलेट छान कडक होतील.
  • आंब्याच्या रसामुळे पिवळसर केशरी व कैरीचा हिरवटपणा असे मिश्रण असल्यामुळे हे रंगीत पौष्टिक चॉकलेट मुलांना नक्कीच आवडतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.