तिरंगी कुल्फी रेसीपी मराठीत | Tirangi / Tiranga Kulfi Recipe in Marathi
साहित्य:
- १ लीटर दूध,
- १ पेला साखर,
- १ चमचा कॉर्नफ्लावर,
- अर्धा छोटा चमचा विलायची पावडर
- १ छोटा चमचा केसर,
- १०-१२ पिस्ते भिजलेले.
कृती:
- दूध उकळून अर्धे करावे.
- कॉर्नफ्लावर, साखर व विलायची टाकून उकळावे.
- त्याचे सारखे भाग करावे.
- एका भागावर केसर, एका भागावर पिस्त्याचे तुकडे टाकावे व एक भाग साधा राहु द्यावा.
- कुल्फी च्या साच्यात खाली केसरयुक्त दूध,
- थोडी जमल्यावर पांढरे दूध तेही थोडे जमल्यावर पिस्ते मिसळलेले दूध टाकावे.
- फ्रिजरमध्ये १२ तास ठेवावे.
- तिरंगी कुल्फी तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.