पांढऱ्या कोहळ्याचे वडे रेसीपी मराठीत | पांढऱ्या भोपळ्याचे वडे | White pumpkin Vade Recipe in Marathi | Pandharya Bhopdyache Vade
साहित्य-
- चार वाटी पांढऱ्या कोहळ्याचा किस,
- चार वाटी चणा डाळीचा भरडा,
- २ वाटी तुरडाळीचा भरडा,
- २ वाटी उडीद डाळीचा भरडा,
- बारीक चिरलेली मेथी ४ वाटी,
- जिरेपूड चार चम्मच,
- तिखट,
- मीठ,
- हळद अंदाजे,
- धणेपूड चार चमचे.
कृती-
- प्रथम कोहळा फोडून किसून घ्या,
- किसताना भरपूर पाणी सुटतं.
- त्याच पाण्यामध्ये सर्व डाळीचा भरडा रात्रभर भिजवून ठेवा.
- करताना तिखट, मीठ, हळद, धणेपूड, जिरेपूड व कोहळ्याचा किस घाला,
- बारीक चिरून मेथी घाला
- व चांगले मळून लहान लहान आकारात, प्लास्टिक पेपरवर वड्या टाका.
- कडक उन्हामध्ये वाळवून ठेवा.
- या वड्या तेलावर परतून मूगवडीप्रमाणे रस्सा भाजी बनवा.
- खमंग भाजी भाकरीसोबत खायला वाढा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.