टोमॅटो पोेहे वडी रेसीपी मराठीत | Tomato Poha Vadi Recipe in Marathi
साहित्य-
- लाल टोमॅटो १ पाव,
- १ पाव जाड पोहे,
- बारीक चिरून कोथिंबीर २ वाटी,
- तीळ पाव वाटी,
- बारीक ठेचलेली हिरवी मिरची पाव वाटी,
- मीठ अंदाजे,
- जिरे पूड ४ चमचे.
कृती-
- पोहे एक तास भिजवून ठेवा.
- टोमॅटो बारीक चिरून घ्या,
- टोमॅटो व पोहे चांगले चुरून घ्या.
- मिरचीचा ठेचा, तीळ, जिरेपूड व अंदाजे मीठ घाला.
- चांगले मळून प्लास्टिक पेपर चापट आकारात वड्या टाका.
- कडक उन्हामध्ये वाळवून ठेवा.
- खिचडीसोबत तोंडी लावणे म्हणून तळून वाढा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.