सांबार रेसीपी मराठी | Sambar Recipe in Marathi | How to make Sambar
साहित्य :
- एक वाटी चणा डाळ,
- एक वाटी टोमॅटो बारीक चिरून
- ४/५ चमचे तेल,
- २ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस,
- चमचाभर भाजून कुटलेली खसखस
- कोथिंबीर,
- डावभर तेल
- २ बडी वेलची
- १ तमालपत्र,
- हळद,
- लाल तिखट,
- १ चमचा धने
- जिरपूड १ चमचा,
- मीठ,
- काळा मसाला दीड चमचा.
कृती :
- चणा डाळ ४/५ तास पाण्यात भिजत घालावी.
- कढईत चार चमचे तेल घाला.
- त्यावर कांदा व खोबराकीस घालून गुलाबीसर परतावा.
- मग तो खाली घ्यावा.
- त्यात टोमॅटो, खसखस, कोथिंबीर, घालून मिक्सवर मिश्रण वाटून घ्यावे.
- कढईत डावभर तेल घालावे.
- त्यात बडी वेलची, तमालपत्र घालून परतावे.
- वाटलेला मसाला घालावा.
- हळद, तिखट, धने, जिरपूड, काळा मसाला घालून परतावे.
- त्यात भिजलेली डाळ घालावी व परतावे.
- मीठ चवीप्रमाणे व एक मध्यम भांडे पाणी घालून वरण शिजवावे.
- वाढताना कोथिंबीर घालावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.