बीट लाडू रेसीपी मराठीत | Nutritious Beetroot And Coconut Laddu / Balls Recipe in Marathi
साहित्य :
- एक वाटी बीटाचा कीस,
- एक वाटी गाजराचा कीस,
- एक वाटी ओले खोबरे,
- एक वाटी साखर,
- अर्धी वाटी दूध,
- दोन चमचे सुके खोबरे.
कृती :
- प्रथम सारण तयार करून घ्यावे.
- त्यासाठी बदाम, पिस्ते, काजू, मनुका यांचे बारीक काप करून पिठी साखरेत एकत्र करून घ्यावेत.
- बीटाचा आणि गाजराचा कीस, साखर,ओले खोबरे आणि दूध एकत्र करून अर्धा तास ठेवावे.
- नंतर गरम करून ढवळावे,
- घट्ट गोळा भांड्यात फिरू लागला की खाली उतरून तूप लावलेल्या हाताने त्याच्या लिंबाएवढ्या गोळ्यांची पाती करून त्यात सारण घालून लाडू वळावेत.
- चांदीवर्ख किंवा सुक्या खोबऱ्याच्या किसात सजवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.