झटपट सोयाबीनचे पौष्टिक लाडू रेसीपी मराठीत | Instant Nutritious Soyabean Laddu Recipe in Marathi | Soybean Ladoo
साहित्य :
- एक वाटी गव्हाचे पीठ,
- अर्धी वाटी सोयाबीन पीठ,
- पाव वाटी पिठी साखर,
- पाव वाटी डिंक,
- पाव वाटी खारीक,
- पाव वाटी बदाम काप,
- अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस,
- पाव वाटी मनुका,
- साजूक तूप.
कृती :
- प्रथम फ्रायपॅन मध्ये तूप घेऊन गरम करावे.
- त्यात गव्हाचे व सोयाबीनचे पीठ भाजून घ्यावे.
- पीठ भाजत आल्यावर त्यातच बारीक केलेला डिंक परतुन गॅस बंद करावा
- आणि बाकीचे सर्व साहित्य घालून (साखर वगळता) एकजीव करून घेणे.
- मिश्रण थंड झाल्यावर पिठी साखर घालून लाडू वळावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.