बीटची खीर रेसिपी मराठीत | चुकंदर ची खीर । Beet chi Khir Recipe in Marathi । Beetroot Khir । Chukandar Khir
साहित्य-
- १ वाटी बीटचा किस,
- २ वाट्या दूध,
- पाव च. कस्टर्ड पावडर,
- पाऊण वाटी साखर,
- अर्धा वाटी खोबरं किस,
- चिमूटभर वेलची पूड,
- काजू- बदामाचे काप.
कृती-
- प्रथम बीटचा किस, थोडं दूध घालून वाफवून घ्या.
- नंतर त्यात उरलेलं दूध घाला.
- उकळल्यावर थोडं दूध वाटीत घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळा.
- हे कस्टर्ड दूध त्यात घाला.
- नंतर साखर, वेलची पूड, खोबर किस, काजू- बदामाचे काप घाला.
- एक उकळी आल्यावर खाली उतरवून बाउलमध्ये काढा व सर्व्ह करा, गरमा- गरम खीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.