ब्लॅक करंट आइस्क्रीम रेसीपी मराठीत | Black Currant Ice Cream Recipe in Marathi
साहित्य -
- ५०० ग्रॅम दूध,
- २ टे. स्पू. साय,
- ८ टे. स्पू. साखर,
- २ टे. स्पू. कॉर्न फ्लोअर,
- दीड टे.स्पू, जीएमएस पावडर,
- चिमूटभर स्टॅबिलायझर पावडर,
- काळी द्राक्षं २०० ग्रॅम,
- १/२ टी. स्पू. ब्लॅक करंट इसेन्स.
कृती-
- दूध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करायला ठेवावं.
- त्यातूनच अर्धी वाटी कोमट दूध काढून त्यात कॉर्न फ्लोअर, जीएमएस, स्टॅबिलायझर पावडर आणि साखर हे घटक एकत्र करावे.
- दुधाला उकळी आल्यावर त्यात कॉर्न फ्लोअरचे मिश्रण टाकून ते सतत ढवळावं.
- दोन मिनिटांनी दुधाला दाटपणा आल्यावर गॅस बंद करावा.
- मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनियमच्या डब्यात टाकून सेट करायला ठेवावं.
- द्राक्ष स्वच्छ धुवून बंद डब्यात ठेवून कुकरमधून वाफवून घ्यावेत.
- कुकरमधून काढून गार झाल्यावर मिक्सरमधून त्याची प्यूरी तयार करावी.
- ही प्यूरी दाटसर असावी,
- आइस्क्रीम बेस सेट झाल्यावर फ्रीजरमधून काढून त्यात साय, द्राक्षाची प्यूरी, इसेन्स घालून हँड मिक्सरनं ते चांगले फेटून घ्यावं.
- चांगलं फुगल्यावर मिश्रण डब्यात ओतून सात-आठ तास फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.