फालुदा कुल्फी | Faluda Kulfi Recipe in Marathi | Falooda Ice Cream
साहित्य-
- १ वाटी जाडसर शेवयांचा चुरा,
- साखर चवीनुसार,
- १ लीटर दूध,
- २ टे.स्पू. सब्जा बी,
- २ टे. स्पू. रोझ सिरप,
- ड्राय फ्रूट्सचे काप,
- रोझ इसेन्स,
- १ टे. स्पू. कॉर्न फ्लोअर पावडर,
फालुदा कुल्फी | Faluda Kulfi Recipe in Marathi | Falooda Ice Cream |
कृती -
- दुधात कॉर्न फ्लोअर आणि साखर घालून ते गरम करायला ठेवावं.
- दूध आटवून ते निम्मं करून त्यात रोझ इसेन्स टाकून गैस बंद करावा.
- मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर कुल्फीच्या साच्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये आठ-दहा तास ठेवावं,
- एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावं.
- त्यात थोडं तूप घालून शेवया घालाव्यात.
- जरा वेळ शिजल्यावर चाळणीवर ओतून निथळून घ्याव्यात,
- वरून गार पाणी ओतावं.
- सब्जा बी पाण्यात भिजत घालावं.
- कुल्फी सेट झाल्यावर प्लेटमध्ये कुल्फीचे स्लाइसेस करून ठेवावे,
- त्यावर शेवया-रोझ सिरप व ड्राय फ्रूट्सचे काप पसरवून कुल्फी फालुदा खाण्यास द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.