मार्बल कुल्फी | मावा कुल्फी रेसीपी मराठीत | Marble Kulfi Recipe in Marathi | Mawa Kulfi
साहित्य-
- १/२ लीटर दूध,
- १/२ वाटी फेटलेली साय.
- १ टे.स्पू.कोको पावडर,
- दोन टे. स्पू. मिल्क पावडर,
- चवीनुसार साखर,
- वेलची, जायफळ पूड
- १०० ग्रॅम मावा.
मार्बल कुल्फी | मावा कुल्फी रेसीपी मराठीत | Marble Kulfi Recipe in Marathi | Mawa Kulfi |
कृती -
- दूध गरम करायला ठेवावं.
- त्यात मिल्क पावडर आणि साखर टाकून ५ मिनिटं आटवावं,
- गॅस बंद करून त्यात साय आणि मावा कुस्करून टाकावा.
- या मिश्रणात जायफळ-वेलची पावडर टाकून ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फेटावं,
- या मिश्रणाचे दोन भाग करावेत.
- मिश्रणाच्या एका भागात कोको पावडर घालून ते मिश्रण परत मिक्सरमधून फिरवून घ्यावं.
- कुल्फी मोल्डमध्ये आधी पांढरं मिश्रण घालावं.
- अर्धे मोल्ड भरल्यावर कोकोचं मिश्रण हळुवारपणे त्यात टाकून चमच्याच्या मागच्या बाजूंनी किंचित हलवावं.
- झाकण लावून फिजरमध्ये सेट करायला ठेवावं,
- सेट झाल्यावर कुल्फी मोल्डमधून काढून ती बारीक तुकड्यात कापून खाण्यास द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.