शाही पनीर रेसीपी मराठीत | Shahi Paneer Recipe in Marathi

शाही पनीर रेसीपी मराठीत | Shahi Paneer Recipe in Marathi |
साहित्य:-
- ५०० ग्रा. पनीर,
- १ वाटी टोमॅटो प्युरी,
- अर्धी वाटी कांद्याची पेस्ट,
- आलं-लसूण पेस्ट २ टे.स्पून,
- खडी लाल मिरची १०-१२,
- गरम मसाला १ टी.स्पू.,
- अर्धी वाटी साय,
- अर्धी वाटी मावा,
- दोन टेस्पून. दही,
- मीठ,
- तेल,
- कोथिंबीर.
शाही पनीर रेसीपी मराठीत | Shahi Paneer Recipe in Marathi
कृती:-
- पनीरचे लांबट चौकोनी टुकडे करून घ्या.
- कढईत तेल टाकून गरम तेलात पनीर तळून घ्या.
- उरलेले तेलात क्रमानी आलं-लसूण पेस्ट, कांदा पेस्ट, टोमॅटो प्युरी परता.
- (लाल मिरची गरम पाण्यात टाकून पेस्ट करा)
- मिरची पेस्ट, मावा, दही टाकून परता.
- परतल्यानंतर बाजूनी तेल सुटल्यावर पाणी टाका.
- उकळल्यावर पनीर टाकून गॅस बंद करा,
- सर्व्ह करताना पनीरच्या वाटीत घुसळलेली साय टाकून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.