मसाला नान | Masala Naan Recipe in Marathi
साहित्य -
- १/२ वाटी कणिक,
- २ वाट्या मैदा,
- अर्धा वाटी दही,
- चवीपुरतं मीठ,
- २ टी. स्पू. साखर,
- अर्धा टी. स्पू. खाण्याचा सोडा,
- २ टे.स्पू. तेल किंवा तूप,
- १ टी.स्पून खसखस,
- १ टी.स्पून बडी शेप,
- १ टी.स्पून कलौजी.
कृती:-
- एका भांड्यात १/२ वाटी कणिक, २ वाट्या मैदा, अर्धा वाटी दही, चवीपुरतं मीठ, २ टी. स्पू. साखर, अर्धा टी. स्पू. खाण्याचा सोडा, २ टे.स्पू. तेल किंवा तूप, १ टी.स्पून खसखस, १ टी.स्पून बडीशेप, १ टी.स्पून कलौजी हे सर्व साहित्य एकत्र करा.
- पाण्यानी भिजवून पीठ तासभर झाकून ठेवा.
- गोळे बनवून लांबट पण जाडसर नान लाटा
- आधी तव्यावर नंतर गॅस किंवा शेगडीवर भाजा.
- तूप लावून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.