Halaman

    Social Items

पोह्याची उकडपेंडी | Pohyachi Ukadpendi Recipe in Marathi | How to Make Pohyachi Ukadpendi

पोह्याची उकडपेंडी | Pohyachi Ukadpendi Recipe in Marathi | How to Make Pohyachi Ukadpendi



साहित्य-

  • १ वाटी सातूचे पीठ,
  • अर्धी वाटी पातळ पोहे,
  • मोहरी,
  • तेल १ मोठा चमचा,
  • तिखट,
  • मीठ,
  • हळद,
  • दही
  • चवीला साखर
  • कोथिंबीर बारीक चिरलेली,
  • कढीपत्ता,
  • बारिक चिरलेला कांदा,
  • १ हिरवी मिरची. 


कृती-


  • प्रथम जाड बुडाच्या कढईत तेल टाकून मोहरी तडतडु द्यावी.
  • नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची व थोडी हळद टाकून स्वच्छ केलेले पातळ पोहे लाल होईपर्यंत परतावे.
  • नंतर त्यात सातूचे पीठ, तिखट, मीठ टाकून हे मिश्रण परत मिक्स करुन परतावे.
  • पीठ खमंग भाजावे.
  • नंतर त्यात थोडे दही, व चवीप्रमाणे साखर व कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरुन त्यात टाका.
  • नंतर चांगले हलवून बारीक गॅस वर ठेवून कढईवर झाकण ठेवावे.
  • चांगली वाफ आल्यावर भांड्यात उकडपेंडी काढावी
  • व सर्व्ह करताना पुनः कोथिंबीर व खोबऱ्याचा किस टाकावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.