मक्याच्या कणसाची उसळ | भुट्टयाचा उपमा | Makkyachi Usal Recipe in Marathi | Sweet corn Upma
साहित्य -
- मक्याच्या कणसाचे दाणे दोन वाट्या,
- हिरव्या मिरच्या दोन-तीन,
- जिरे,
- अद्रक,
- ओल्या नारळाचा किस,
- मीठ,
- साखर
कृती -
- कणसाचे दाणे काढून पाट्यावर ठेचावे,
- नंतर त्यात थोडे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून शिजवावे.
- चांगले शिजल्यावर थोड्या तुपात किंवा तेलात हिंग-मोहरी टाकून फोडणी करा
- त्यात शिजलेले दाणे फोडणीला टाकावेत.
- नंतर त्यात हिरव्या मिरच्या चिरून टाकावे
- नंतर त्यात चवीला साखर, थोडी मिरेपुड व ओले खोबरे किसलेले घालून चांगले एकजीव करून वाफ आणावी.
- ओल्या नारळामुळे कणसाच्या उसळीला चव येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.