Khamang Masvadi Recipe in Marathi| How to make Masvadi | खमंग मासवडी
साहित्य-
- ५० ग्रॅम पांढरे तीळ,
- दोन मोठे कांदे,
- लसणाचे दोन गाठे,
- २५ ग्रॅम शेंगदाणे,
- ५० ग्रॅम सुकं खोबरं,
- १५० ग्रॅम चण्याचं पीठ चक्कीवर दळलेलं,
- लाल तिखट एक चमचा,
- मीठ चवीनुसार,
- एक लहान चमचा हळद,
- १ ग्लास पाणी,
- लहान अर्धा चमचा जिरं,
- कोथिंबीर
कृती-
- प्रथम बारीक गॅसवर पांढरे तीळ लाल होईपर्यंत खरपुस भाजावे.
- मिक्सरमध्ये बारीक करा.
- दोन मोठे कांदे बारीक चिरा.
- तव्यावर तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत भाजावे.
- दोन लसूण गाठे सोलावे.
- व मिक्सरमध्ये बारीक करा.
- नंतर ५० ग्रॅम सुके खोबरे मिक्सरमध्ये बारीक करा.
- व तव्यावर भाजावे.
- त्यात २५ ग्रॅम शेंगदाण्याचा कूट मिक्स करुन व्यवस्थित परतून घ्यावे.
- नंतर हे सर्व मिश्रण एका ताटात घ्यावे.
- नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.
- नंतर एका भांड्यात दोन पळी तेल टाकून गरम करण्यास ठेवावे.
- तेल गरम झाल्यावर त्यात छोटा अर्धा चमचा जिरे, एक मोठा चमचा तिखट, छोटा अर्धा चमचा हळद व अर्धा छोटा चमचा मीठ टाकून चांगले मिक्स करुन घ्यावे.
- नंतर त्यात १५० ग्रॅम चण्याचं पीठ टाकावे.
- नंतर मोठ्या पळीच्या चमच्याने घट्ट होईपर्यंत बारीक गॅसवर हलवावे.
- मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवावे. नंतर एक स्वच्छ पातळ पांढरे कापड ओलं करून पोळी पाटावर टाकून घ्यावे.
- कपड्यावर थोडे पाणी शिंपडून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यावी.
- नंतर चेंडूच्या आकाराचा घट्ट पिठाचा गोळा करून पोळी लाटून पाटावर पसरवून घ्यावे
- आणि नंतर हाताने पापडाच्या आकाराप्रमाणे गोलाकार पसरवुन घ्यावे.
- नंतर ताटातील कांदा, लसूण, खोबरं, तीळाचे अर्धे मिश्रण पसरवलेल्या पिठावर गोलाकार थापून घ्यावे,
- पोळी पाटावरील कपडा हाताने उचलून गोलाकार रोल तयार करावे.
- नंतर दोन हाताने रोल दाबून कापड बाजूला करावे.
- मिश्रणाची लांब आकाराची मोठी वडी तयार करावी.
- व ती एका मोठ्या पसरट ताटात काढावे.
- थंड झाल्यावर सुरीने व्यवस्थित एक इंचाच्या वड्या कापाव्यात.
- या वडीला बेसनवडी म्हणतात.
- पण जुन्नर भागात या वडीला 'मासवडी' असं संबोधले जाते.
- कांदा-खोबऱ्याच्या भाजलेल्या मसाल्याचा रस्सा करून त्यात मासवडी ठेवून गरमागरम बाजरीच्या भाकरी किंवा चपातीबरोबर आस्वाद घ्यावा.
- रस्स्यामुळे वडीची लज्जत अधिकच वाढते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.