How to Make BaluShahi Recipe in Marathi | Khurmi Recipe |बालुशाही
Recipe in English
साहित्य:
- मैदा- २ वाटी,
- बेकींग पावडर- १ चमचा,
- तूप- अर्धी वाटी,
- साखर- २ वाटी,
- इलायची- ४-५,
- केसर- १/४ चमचा,
- पाणी- आवश्यकतेनुसार,
- तळण्यासाठी तेल
कृती-
- एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, तूप टाकून नीट मिक्स करून घ्या,
- नंतर त्यात पाणी घालून पीठ मळून उंडा तयार करून १५ मिनीटे झाकून ठेवा.
- एका वाटीत १ चमचा पाणी घेऊन त्यात १/४ चमचा केसर टाकून भिजत ठेवा.
- आता गॅसवर एका पॅनमध्ये १ वाटी पाणी टाकून त्यात २ वाटी साखर घालून नीट हालवून घ्या.
- साखरेचा चांगला पाक तयार होईपर्यंत हालवत राहा,
- पाहिजे तसा घट्ट पाक तयार झाला कि त्यात केसर घालून ठेवलेले पाणी घालून मिक्स करून घ्या.
- पॅन बाजूला काढून थंड व्हायला ठेवा.
- आता तयार झालेल्या पीठचा उंडा हाथाने मिक्स करून घ्या.
- त्याचे छोटे छोटे गोळे करून बालुशाहीचा आकार देऊन गरम तेलात तळून घ्या.
- हि तळलेली बालुशाही पाकात बिजवून ठेवा (ज्यांना जास्त गॉड आवडत नाही त्यांनी पाकातून काढून ठेवा).
- छान बालुशाही तयार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.