नारळ कढीमधील पालक समोसा रेसीपी मराठी | कैसे पालक का समोसा बनाएं |पालक समोसा बनाने की विधि|पालक समोसा बनाने का तरीका | बनाएं बहुत ही टेस्टी क्रिस्पी और चटपटे पालक के खस्ता समोसा । Palak Samosa Recipe in Marathi | Tasty and Healthy Recipe | Spinach Samosa | Palak Samosa stuffed with Aloo, Mutter | Khasta palak samosa। Crispy palak samosa
साहित्य :
- मैदा,
- तूप,
- मीठ,
- पालक
- फिलिंगकरिता उकडलेला बटाटा २,
- एक कप मटार वाफवून,
- एक गाजर बारीक तुकडे करून वाफवून,
- धने,
- जिरे,
- हिंग,
- एक चमचा मिरची पेस्ट,
- एक चमचा आमचूर,
- एक चमचा गरम मसाला,
- चवीप्रमाणे मीठ,
- तेल,
- एक चमचा लिंबूरस,
- साखर,
कढीकरिता :
- १|| कप नारळ दूध,
- दोन कप दही,
- दोन चमचे बेसन,
- दोन वेलदोडे,
- तीन लवंगा,
- एक दालचिनी तुकडा,
- एक तेज पत्ता,
- पाच-सहा कढीलिंब पाने,
- पाव चमचा आलेपेस्ट,
- एक चमचा लाल मिरची कापून.
कृती :
- बटाटा उकडून स्मॅश करणे,
- गाजर, मटार वाफवून घेणे.
- त्यात आले, मिरची, धने, जिरे पूड, हिंग पूड टाकणे.
- लिंबूरस, साखर घालणे.
- मीठ घालणे,
- मिश्रण एकत्र कालविणे,
- पालक प्युरीमध्ये भिजवणे.
कव्हरकरिता :
- मैदा, तूप एकत्र फेटणे,
- चवीपुरते मीठ घालणे.
- गोळा गरम पाण्यात भिजवणे.
- एक तासभर ओल्या फडक्यात लपेटून ठेवणे.
- एक तासानंतर पीठ कुटून घेणे.
- बटाट्याचे तयार मिश्रण भरून नेहमीप्रमाणे समोसे करणे.
- तेलात तळून काढणे.
- दही, बेसन पीठ एकत्र मिक्सरमधून काढणे.
- त्याला वेलदोडा पूड, तुपाची फोडणी करणे.
- त्यात लवंग, तेजपत्ता घालणे,
- लालमिरची घालणे,
- त्यात आलेपेस्ट टाकणे,
- मिक्सरमधून काढलेले दह्याचे मिश्रण ओतणे.
- साखर-मीठ घालणे.
- मंद आचेवर कढी ठेवणे.
- त्यात नारळाचे दूध घालणे (कढी उकळायची नाही. नाहीतर कढी फुटण्याचा संभव असतो)
सर्व्ह करणे :-
- समोसे एक-एक डिशमध्ये ठेवावे;
- त्यावर तयार केलेली कढी घालणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.