चण्याच्या डाळीच्या मसालेदार वड्या रेसीपी मराठी | Chanyachya Dalichya Masaledar Vadya Recipe in Marathi | Spicy Wadya of lentils
साहित्य-
- चण्याची डाळ भिजवून उपसून बारीक वाटावी.
- तीळ २५० ग्रॅम,
- १ मोठा चमचा गरम मसाला,
- हळद,
- मीठ,
- हिंग,
- जिर व
- तिखट,
- तेल.
कृती-
- भिजवून बारीक वाटलेल्या चण्याच्या डाळीत सर्व साहित्य मिसळून चांगले फेटून घ्या
- प्लास्टीक शीटला तेल लावून त्यावर वड्या टाकाव्यात व
- उन्हात वाळवाव्यात.
वाळवलेल्या वड्यांविषयी घेण्याची दक्षता
टीप्स-
- वड्या नेहमी कडक उन्हातच वाळवाव्यात.
- चांगल्या वाळल्यानंतरच डब्यात भरून ठेवाव्यात.
- ओलसर राहिल्या तर बुरशी येते.
- मसालेदार वड्या करताना वड्यांच्या मिश्रणात मसाला थोडा जास्त टाकावा.
- कडक उन्हामुळे स्वाद कमी होता.
- वाळवलेल्या वड्यांची भाजी करताना प्रथम वड्या थोडे तेल कढईत टाकन परतून भाजाव्यात.
- त्यामुळे भाजीला चव येते.
- खमंग लागते.
- वड्या वाळवताना दोन्ही बाजूने उलटाव्यात म्हणजे पूर्ण सर्व बाजूने वड्या वाळतात व
- खराब होत नाहीत.
- वाळलेल्या वड्या डब्यात ठेवताना त्यात २-३ लवंगा व मधून-मधून वड्या पाहाव्यात.
- कित्येक वेळा टाकाव्यात व
- मधून-मधून वड्या पाहाव्यात.
- कित्येक वेळा त्यात सोंडे होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.