Halaman

    Social Items

बेसनाच्या गाठ्यांच्या वड्या रेसीपी मराठी | बेसन सांडगे | वाळवण | Besan Gathi Vadi Recipe in Marathi | Besan Sandage | Vadavan

 बेसनाच्या गाठ्यांच्या वड्या रेसीपी मराठी | बेसन सांडगे | वाळवण | Besan Gathi Vadi Recipe in Marathi | Besan Sandage | Vadavan






रेच वेळा घरात भाजी नसल्याने वेळेवर काय करावे हा प्रश्न गहिणींना असतो. अशावेळी उन्हात वाळवून वर्षभर टिकणाऱ्या वड्यांचा भाजीकरिता चांगला उपयोग होतो. मुगवड्यांची भाजी आपण नेहमीच. करतो. परंतु काही वेगळ्या प्रकारच्या वड्या संग्रही ठेवल्यास (वाळवलेल्या) नावीन्यपूर्ण व रुचकर भाजी करता येते. बघू तर वेगळ्या वड्यांचे प्रकार -






साहित्य-


  • २५० ग्रॅम बेसन,
  • ४ मोठे चमचे तेल,
  • चवीनुसार मीठ,
  • तिखट १ मोठा चमचा,
  • १ चमचे जिरे.






कृती-


  • बेसनात २ मोठे चमचे तेल टाकून सर्व साहित्य मिसळून ते घट्ट भिजवावे.
  • नंतर साधारण जाडी पोळी लाटून त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करावे.
  • एका पातेल्यात उकळीच्या पाण्यात हे तुकडे टाकून ५-१० मिनिट उकळावे.
  • नंतर एका ताटाला किंवा प्लास्टीक शीटला तेल लावून त्यावर या वड्या टाकून कडक उन्हात वाळवाव्यात.





वाळवलेल्या वड्यांविषयी घेण्याची दक्षता



टीप्स-


  • वड्या नेहमी कडक उन्हातच वाळवाव्यात.
  • चांगल्या वाळल्यानंतरच डब्यात भरून ठेवाव्यात.
  • ओलसर राहिल्या तर बुरशी येते.
  • मसालेदार वड्या करताना वड्यांच्या मिश्रणात मसाला थोडा जास्त टाकावा.
  • कडक उन्हामुळे स्वाद कमी होता.
  • वाळवलेल्या वड्यांची भाजी करताना प्रथम वड्या थोडे तेल कढईत टाकन परतून भाजाव्यात.
  • त्यामुळे भाजीला चव येते.
  • खमंग लागते.
  • वड्या वाळवताना दोन्ही बाजूने उलटाव्यात म्हणजे पूर्ण सर्व बाजूने वड्या वाळतात व
  • खराब होत नाहीत.
  • वाळलेल्या वड्या डब्यात ठेवताना त्यात २-३ लवंगा व मधून-मधून वड्या पाहाव्यात.
  • कित्येक वेळा टाकाव्यात व
  • मधून-मधून वड्या पाहाव्यात.
  • कित्येक वेळा त्यात सोंडे होतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.